Search This Blog

Friday, October 30, 2026

भक्तिमय वातावरणात दिनांक 29/10/2026 रोजी श्री हालसिद्धनाथांना महानैवेद्य अर्पण...

काल दिनांक 29/10/2026 रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता या दिवशी दिवसभर श्रींना महानैवेद्य अर्पण करण्यात आला.रात्री श्रींची पालखी सबीना (प्रदक्षिणा) तसेच मंदिरामध्ये लहान मुलांचे गजनृत्य चा सुंदर आणि मनमोहक कार्यक्रम झाला.त्यानंतर पहाटे दुसरी मुख्य भाकणूक कार्यक्रम.30 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता घुमट मंदिरात भाकणूक.दुपारी 4 वाजता श्रींची पालखी सबीना (प्रदक्षिणा) होऊन यात्रेची सांगता होणार आहे.आज दिनांक काल मंदिरामध्ये व मंदिर परिसरात भरपूर मोठी गर्दी झालेली होती तरी आज यात्रेच्या शेवटच्या दिवशी ही भरपूर प्रमाणात गर्दी होईल तरी सर्व भाविकांनी योग्य ती काळजी घ्यावी कोणताही अनुचित प्रकार घडला तरी ग्रामपंचायत किंवा यात्रा कमिटी शी संपर्क साधावा. यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खेळणी वेगवेगळे मनोरंजक पाळणे लहान मुलाचे पाळणे आणि भरपूर मोठया प्रमाणात खाण्या पिण्याचे स्टॉल्स लागले आहेत. मेवा मिठाई पेढे बर्फी साखर कापूर नारळ उदबत्ती इत्यादी दुकानें व्यापाऱ्यांनी मंदिर परिसरात लावलेली आहेत मंदीर परिसर नाथ भक्तांनी आणि भंडाऱ्याने न्हाऊन गेला आहे सगळीकडे अगदी आनंदी आनंद पसरला आहे यात्रेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून मंडल पोलीस निरीक्षक विभाग व निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त करणेत आलेला आहे. भाकणूक साठी अवश्य भेट द्या.

No comments:

Post a Comment

आप्पाचीवाडी येथे बळीराजा महोत्सव उत्साहात साजरा.

आप्पाचीवाडी येथे उत्साहात संपन्न झाला 'बळीराजा महोत्सव'दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आप्पाचीवाडी येथे 'बळीराजा महोत्सवाचे' अ...