Search This Blog

Wednesday, October 28, 2026

भाकणूककार सिद्धार्थ डोणे महाराज यांचे आज आप्पाचीवाडी मध्ये आगमन होणार.

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ महाराज यांच्या 2026 सालच्या पाच दिवसीय असणाऱ्या भोंब यात्रेच्या आज च्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी नाथांची महाआरती.नंतर गज्जी कार्यक्रम रात्री ढोल जागर आणि श्रीं ची पालखी प्रदक्षिणा सबीना रात्रभर नाथांच्या दरबारात पारंपरिक आणि धार्मिक कार्यक्रम चालत असतात त्यानंतर नाथांची भाकणूक कथन करण्यासाठी रितिरिवाजाप्रमाणे भगवान डोणे महाराज व सिद्धार्थ डोणे महाराज यांना काल मानाचा भंडारा देऊन यात्रेला येण्यास बोलावले जाते त्याप्रमाणे आज श्री भगवान डोणे महाराज सिद्धार्थ डोणे महाराज यांचे आज आप्पाचीवाडी नगरीं मध्ये आगमन होणार आहे. आप्पाचीवाडी कुर्ली गावातील सर्व मानकरी मिळून भगवान डोणे महाराज व सिद्धार्थ डोणे यांचे स्वागत करून ढोल कैताळ च्या गजरात त्यांना हालसिद्धनाथ मंदिर मध्ये भक्ती भावाने घेऊन येतात. त्यानंतर पहाटेच्या प्रहरी नाथांची पहिली भाकणूक होणार आहे. येणाऱ्या वर्षात जगात काय काय होणार याची सर्व भक्तगणांना उत्सुकता असते.नाथांची भाकणूक ऐकण्यासाठी नाथ भक्त लांबून प्रवास करून आप्पाचीवाडी मध्ये आलेले असतात.

Tuesday, October 27, 2026

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ महाराज यांच्या पाच दिवसीय भोंब यात्रेस उत्साहाने प्रारंभ.

बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ महाराज यांच्या वार्षिक भोंब यात्रेला मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावात सुरुवात झाली.सकाळी कुरली मधून हालसिद्धनाथ महाराज यांची पालखी अश्व ढोल व छत्र्या घेऊन सर्व मानकरी व कुरली मधील भाविक भक्त मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने ढोल कैताळ च्या गजरात आप्पाचीवाडी मधील वाडा मंदिर मध्ये येतात, त्यानंतर वाडा मंदिर मधून दोन्ही पालख्या व आप्पाचीवाडी मधील ढोल,कैताळ,नाथांचे अश्व सर्व मानकरी व गावकरी भाविक भक्त मिळून खडक मंदिर च्या दिशेने प्रस्थान करतात. महालक्ष्मी मंदिर मध्ये भेट घेऊन पुढे प्रस्थान होते. पुढे पालखी खडक मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून दोन्ही पालख्या अत्यंत भक्तीभावाने मंदिरामध्ये विराजमान झाल्या.पालखी सोहळ्यावर नाथ भक्तांनी खोबरे भंडारा आणि फुलांची मनोभावे उधळण केली.श्री हालसिद्धनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यास नाथ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढचे पाच दिवस नाथांचा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमाने चालणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा. यात्रेच्या काळामध्ये सौंदलगा येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मोफत आरोग्य सेवा देण्यात येत आहे सर्व यात्रेकरूंनी याचा लाभ घ्यावा. तसेच मंदिराच्या दक्षिण बाजूला मराठी शाळेच्या अंगणात श्री हालसिद्धनाथ अन्नछत्र सेवा यांच्या माध्यमातून मोफत अन्नदान ची व्यवस्था केली आहे तरी समस्त भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा.तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांसाठी कागल कोल्हापूर निपाणी चिकोडी रायबाग संकेश्वर गारगोटी येथून ज्यादा बसेस ची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्राकाळात होणारी गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निपाणी मंडल पोलीस निरीक्षक श्री बी एस तलवार निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री शिवराज नायकवडी व त्यांच्या पथकाने योग्य फौजफाटा तैनात केलाआहे.तरी भाविकांनी ही योग्य ती खबरदारी घ्यावी व शांतपणाने यात्राकाळात सहकार्य करावे हीच विनंती.

भाकणूककार सिद्धार्थ डोणे महाराज यांचे आज आप्पाचीवाडी मध्ये आगमन होणार.

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ महाराज यांच्या 2026 सालच्या पाच दिवसीय असणाऱ्या भोंब यात्रेच्या आज च्या तिसऱ्या दिवशी संध्या...