Search This Blog
Friday, November 13, 2026
आप्पाचीवाडी येथे बळीराजा महोत्सव उत्साहात साजरा.
आप्पाचीवाडी येथे उत्साहात संपन्न झाला 'बळीराजा महोत्सव'दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आप्पाचीवाडी येथे 'बळीराजा महोत्सवाचे' अतिशय उत्साहात आणि आनंदात आयोजन करण्यात आले.या विशेष कार्यक्रमास गावातील तसेच परिसरातील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आप्पाचीवाडीचे प्रतिष्ठित नागरिक श्री. आर. एम. अण्णा खोत यांनी भूषवले. उद्घाटन व फोटो पूजन: कार्यक्रमाची सुरुवात गावातील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व श्रीफळ देऊन श्री प्रदीप रमेश हेलाटे यांचे हस्ते करण्यात आले. बळीराजाच्या योगदानावर सखोल मार्गदर्शन महोत्सवामध्ये श्री. एडवोकेट सूर्याजी पोटले सर यांनी 'बळीराजा' या विषयावर अत्यंत सखोल आणि मार्गदर्शक भाषण केले.त्यांनी आपल्या मनोगतात शेती, संस्कृती आणि समाजजीवनातील बळीराजाच्या अमूल्य योगदानावर सुंदर प्रकाश टाकला.भारतीय संस्कृतीमध्ये बळीराज्याचे असलेले अतुट आणि अढळ स्थान आणि भारतीय इतिहास जिवंत ठेवण्याचे मौल्यवान कार्य आपल्या बळीराजाने कसे केले आहे, याविषयी त्यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. सचिन माने यांनी केले.या दिमाखदार सोहळ्यास आप्पाचीवाडी गावातील विविध मान्यवर श्री शशिकांत पोटले, श्री सुरेश लोहार, श्री आशिष करे, श्री बाबुराव लोहार, श्री संजय माने, श्री संभाजी माने, श्री अंकुश माने, श्री प्रदीप माने, श्री संदीप माने आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.
Subscribe to:
Posts (Atom)
आप्पाचीवाडी येथे बळीराजा महोत्सव उत्साहात साजरा.
आप्पाचीवाडी येथे उत्साहात संपन्न झाला 'बळीराजा महोत्सव'दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आप्पाचीवाडी येथे 'बळीराजा महोत्सवाचे' अ...
-
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ महाराज यांच्या 2026 सालच्या पाच दिवसीय असणाऱ्या भोंब यात्रेच्या आज च्या तिसऱ्या दिवशी संध्या...
-
महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा येथील सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळगाव जिल्हा निपाणी तालुक्यातील तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्र...
-
बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ महाराज यांच्या वार्षिक भोंब यात्रेला म...