Tuesday, October 14, 2025

श्रीं हालसिद्धनाथ महाराज कि जय चांगभलं च्या गजरात यात्रेची सांगता

 

महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा येथील सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळगाव जिल्हा निपाणी तालुक्यातील तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हलसिद्धनाथ महाराज यांच्या पाच दिवस चालणाऱ्या बोंब यात्रेची सांगता भाविकांच्या मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झाली. दिनांक 8 ऑक्टोंबर 2025 रोजी यात्रेला सुरुवात झाली पाच दिवस मंदिर मध्ये धार्मिक कार्यक्रम चालले रात्री ढोल जागर सबीना प्रदक्षिणा पालखी आणि मुख्य आकर्षण म्हणजे वाघापूर तालुका भुदरगड येथील श्री भगवान डोने महाराज वाघापूर व त्यांचे सुपुत्र श्री सिद्धार्थ डोने महाराज यांची भाकणूक ती ऐकण्यासाठी लांब लांबून भक्तांची उपस्थिती होती दिनांक 11 ऑक्टोंबर 2025 रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता त्या दिवशी महानैवैद्य आणि मुख्य भाकणूक होती सकाळी सात वाजता घुमटातील भाकणूक झाली. दिवसभर भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली रायबाग येथील मानकरी यांच्या हस्ते कर तोडून यात्रेच्या सांगतेला सुरुवात झाली. संध्याकाळी पाच वाजता ढोल सुरू झाले व त्यानंतर हालसिद्धनाथांची उत्सवमूर्ती पालखीत बसवून मंदिर भोवती प्रदक्षिणा घेऊन पालखी सबीना वाडा मंदिर कडे मार्गस्थ झाला पालखी सोहळ्यावर भाविक भक्तांनी अगदी मोठ्या प्रमाणात भंडारा  खारीक खोबरे फुले लोकर याची मनसोक्तपणे आणि मोठ्या भक्ती भावाने उधळण केली दोन्ही पालख्या या वाड्या मंदिर मध्ये आल्यानंतर वाडीची पालखी वाडा मंदिर मध्ये विसावली व कुरलीची पालखी कुरलीकडे रवाना झाली. आणि यात्रेची सांगता झाली. यात्रा काळात यात्रा कमिटी यांनी योग्य प्रकारे नियोजन केलें होते सगळीकडे लाईट व्यवस्था उत्तम केली होती गावातील व गावात येणाऱ्या सर्व रस्त्यांची सफाई किंवा दुरुस्ती केली होती पोलीस प्रशासन व होम गार्डस आणि सर्व सुरक्षा रक्षकांनी अगदी चोख बंदोबस्त करून व्यवस्थित पणे ट्रॅफिक नियोजन केलें योग्य ठिकाणी पार्किंग करून कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेतली होती. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय जागोजागी प्रशासना मार्फत केली होती आणि सौन्दलगा आरोग्य केंद्रमार्फत आवश्यक अश्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध केली होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संपूर्ण पाच दिवस नाथ भक्तांना मोफत अगदी पुरेपूर अन्नछत्राचे आयोजन करणाऱ्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत कारण होणाऱ्या गर्दीचे नियोजन करून त्यांना योग्य प्रकारे अन्नदान करणे खरोखर कौतुकास्पद आहे अशाप्रकारे आप्पाचीवाडी येथील श्री क्षेत्र हालसिद्धनाथ  महाराज यांची अश्विन भोंब यात्रा मोठ्या दिमाखात आणि भक्ती भावात पूर्ण झाली यात्रेसाठी सर्व मानकरी सेवेकरी आप्पाचीवाडी कुरली येथील सर्व ग्रामस्थ नागरिक संपूर्ण पंचक्रोशीतील भाविक प्रशासनातील अधिकारी ग्रामपंचायत मधील सर्व अधिकारी कर्मचारी गावातील व बाहेरील सर्व व्यापारी या सर्वांचे सहकार्याने यात्रा योग्य प्रकारे आणि गोडी गुलाबीने  कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीतपणे पार पडली त्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. जय श्री हालसिद्धनाथ 🙏🙏

Sunday, October 12, 2025

आज मुख्य दिवस महानैवेद्य

 

आज दिनांक 11-10-2025  रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी दिवसभर श्रींना महानैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. रात्री श्रींची पालखी सबीना (प्रदक्षिणा) तसेच मंदिरामध्ये लहान मुलांचे गजनृत्य चा सुंदर आणि मनमोहक कार्यक्रम होत असतो त्यानंतर  पहाटे  दुसरी मुख्य भाकणूक कार्यक्रम होणार आहेत.12 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता घुमट मंदिरात भाकणूक होईल दुपारी 4 वाजता श्रींची पालखी सबीना (प्रदक्षिणा) होऊन यात्रेची सांगता होणार आहे. आज दिनांक 11 ऑक्टोबर रोजी मंदिरामध्ये व मंदिर परिसरात भरपूर मोठी गर्दी झालेली आहे तरी सर्व भाविकांनी योग्य ती काळजी घ्यावी कोणताही अनुचित प्रकार घडला तरी ग्रामपंचायत किंवा यात्रा कमिटी शी संपर्क साधावा. यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खेळणी वेगवेगळे मनोरंजक पाळणे लहान मुलाचे पाळणे आणि भरपूर मोठया प्रमाणात खाण्या पिण्याचे स्टॉल्स लागले आहेत. मेवा मिठाई पेढे बर्फी साखर कापूर नारळ उदबत्ती इत्यादी दुकानें व्यापाऱ्यांनी मंदिर परिसरात लावलेली आहेत मंदीर परिसर नाथ भक्तांनी आणि भंडाऱ्याने न्हाऊन गेला आहे सगळीकडे अगदी आनंदी आनंद पसरला आहे यात्रेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार व निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त करणेत आलेला आहे.

Friday, October 10, 2025

भाकणूककार वाघापूर चे डोणे महाराज यांचे आज आप्पाचीवाडी मध्ये आगमन होणार......

 श्री हालसिद्धनाथ महाराज यात्रा 2025 पाच दिवसीय असणाऱ्या भोंब यात्रेचा आज च्या दिवशी संध्याकाळी नाथांची महाआरती.नंतर गज्जी कार्यक्रम रात्री ढोल जागर आणि श्रीं ची पालखी प्रदक्षिणा सबीना रात्रभर नाथांच्या दरबारात पारंपरिक आणि धार्मिक कार्यक्रम चालत असतात त्यानंतर नाथांची भाकणूक कथन करण्यासाठी रितिरिवाजाप्रमाणे भगवान डोणे महाराज व सिद्धार्थ डोणे महाराज यांना काल मानाचा भंडारा देऊन यात्रेला येण्यास बोलावले जाते त्याप्रमाणे आज श्री भगवान डोणे महाराज सिद्धार्थ डोणे महाराज यांचे आज आप्पाचीवाडी नगरीं मध्ये आगमन होणार आहे. आप्पाचीवाडी कुर्ली गावातील सर्व मानकरी मिळून भगवान डोणे महाराज व सिद्धार्थ डोणे यांचे स्वागत करून ढोल कैताळ च्या गजरात त्यांना  हालसिद्धनाथ मंदिर मध्ये भक्ती भावाने घेऊन येतात. त्यानंतर पहाटेच्या प्रहरी नाथांची पहिली भाकणूक होणार आहे. येणाऱ्या वर्षात जगात काय काय होणार याची सर्व भक्तगणांना उत्सुकता असते.नाथांची भाकणूक ऐकण्यासाठी नाथ भक्त लांबून प्रवास करून आप्पाचीवाडी मध्ये आलेले असतात.

आप्पाचीवाडी यात्रेस येणाऱ्या यात्रेकरूंना व भाविकांना नम्र सूचना.

 श्री हालसिध्दनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त आप्पाचीवाडी मध्ये येणाऱ्या नागरिकांना व भाविक भक्तांना ग्रामपंचायत आप्पाचीवाडी व यात्रा कमिटी आप्पाचीवाडी यांच्याकडून एक सूचना आहे.पाच दिवस भरणारी श्री हालसिध्दनाथ महाराज भोंब पोर्णिमा यात्रा सुरु आहे त्यानिमित्त देवदर्शनासाठी व खरेदीसाठी येणाऱ्या सर्व भाविकांना कळविण्यात येते की,यात्रा काळात गर्दी वाढत आहे, यात्रेमध्ये चोरीचे प्रमाणही वाढत आहे आणि या गर्दीचा फायदा घेऊनच चोरी करणारे चोर दाग दागिने,मोबाईल किंवा पाकीट चोरून घेऊ शकतात आणि महत्वाचे म्हणजे गळ्यातील चेन किंवा महिलांच्या गळ्यातील दागिने हे खूप सांभाळून आपण यात्रेत वावरले पाहिजे समजा एखाद्या दागिना चोरी झाला तरी तो परत मिळेल याची शक्यता नाही त्यामुळे आपण आपल्या वस्तू व्यवस्थित सांभाळल्या पाहिजेत कारण सामान्य माणसाला एकदा एक सोन्याचा दागिना किंवा मोबाईल किंवा अन्य कोणतीही गोष्ट खरेदी करताना किती कष्ट करावे लागतात हे ज्याचं त्यालाच माहिती असते. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढ्या महागड्या व मौल्यवान वस्तू आपण घरी ठेऊन यात्रेला आलेलं चांगले.यात्रेमध्ये अलीकडच्या काळात चोरी च्या भरपूर घटना घडत आहेत त्यामुळे आपणही सजग राहिले पाहिजे त्यामुळे वरील सूचनांचे पालन करून आपण जसे आलात तसे सुरक्षित आपल्या गावी,घरी जावे हिच सर्वांच्या वतीने नाथ चरणी प्रार्थना.

Wednesday, October 8, 2025

श्री हालसिद्धनाथ देवाची यात्रा 2025 कुर्ली आप्पाचीवाडी


सालाबादप्रमाणे दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी बेळगांव जिल्ह्यामधील निपाणी तालुक्यात असलेल्या तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी मध्ये श्री हालसिद्धनाथ देवाची पाच दिवसीय भोंब यात्रा अश्विन कृ द्वितीय शके 1947 दिनांक 8ऑक्टोबर 2025 ते रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा 

श्रीं हालसिद्धनाथ महाराज कि जय चांगभलं च्या गजरात यात्रेची सांगता

  महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा येथील सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळगाव जिल्हा निपाणी तालुक्यातील तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी येथील श...