Thursday, October 9, 2025

श्री हालसिद्धनाथ महाराज की जय चांगभलं च्या गजरात कुरली आप्पाचीवाडी येथील यात्रेला सुरुवात.

 







बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ महाराज यांच्या वार्षिक भोंब यात्रेला मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावात सुरुवात झाली.सकाळी कुरली मधून हालसिद्धनाथ महाराज यांची पालखी अश्व ढोल व छत्र्या घेऊन सर्व मानकरी व कुरली मधील भाविक भक्त मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने ढोल कैताळ च्या गजरात आप्पाचीवाडी मधील वाडा मंदिर मध्ये येतात, त्यानंतर वाडा मंदिर मधून दोन्ही पालख्या व आप्पाचीवाडी मधील ढोल,कैताळ,नाथांचे अश्व सर्व मानकरी व गावकरी भाविक भक्त मिळून खडक मंदिर च्या दिशेने प्रस्थान करतात. महालक्ष्मी मंदिर मध्ये भेट घेऊन पुढे प्रस्थान होते. पुढे पालखी खडक मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून दोन्ही पालख्या अत्यंत भक्तीभावाने मंदिरामध्ये विराजमान झाल्या.पालखी सोहळ्यावर नाथ भक्तांनी  खोबरे भंडारा आणि फुलांची मनोभावे उधळण केली.श्री हालसिद्धनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यास नाथ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढचे पाच दिवस नाथांचा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमाणे चालणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा.

No comments:

Post a Comment

श्रीं हालसिद्धनाथ महाराज कि जय चांगभलं च्या गजरात यात्रेची सांगता

  महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा येथील सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळगाव जिल्हा निपाणी तालुक्यातील तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी येथील श...