श्री हालसिद्धनाथ महाराज यात्रा 2025 पाच दिवसीय असणाऱ्या भोंब यात्रेचा आज च्या दिवशी संध्याकाळी नाथांची महाआरती.नंतर गज्जी कार्यक्रम रात्री ढोल जागर आणि श्रीं ची पालखी प्रदक्षिणा सबीना रात्रभर नाथांच्या दरबारात पारंपरिक आणि धार्मिक कार्यक्रम चालत असतात त्यानंतर नाथांची भाकणूक कथन करण्यासाठी रितिरिवाजाप्रमाणे भगवान डोणे महाराज व सिद्धार्थ डोणे महाराज यांना काल मानाचा भंडारा देऊन यात्रेला येण्यास बोलावले जाते त्याप्रमाणे आज श्री भगवान डोणे महाराज सिद्धार्थ डोणे महाराज यांचे आज आप्पाचीवाडी नगरीं मध्ये आगमन होणार आहे. आप्पाचीवाडी कुर्ली गावातील सर्व मानकरी मिळून भगवान डोणे महाराज व सिद्धार्थ डोणे यांचे स्वागत करून ढोल कैताळ च्या गजरात त्यांना हालसिद्धनाथ मंदिर मध्ये भक्ती भावाने घेऊन येतात. त्यानंतर पहाटेच्या प्रहरी नाथांची पहिली भाकणूक होणार आहे. येणाऱ्या वर्षात जगात काय काय होणार याची सर्व भक्तगणांना उत्सुकता असते.नाथांची भाकणूक ऐकण्यासाठी नाथ भक्त लांबून प्रवास करून आप्पाचीवाडी मध्ये आलेले असतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
श्रीं हालसिद्धनाथ महाराज कि जय चांगभलं च्या गजरात यात्रेची सांगता
महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा येथील सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळगाव जिल्हा निपाणी तालुक्यातील तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी येथील श...
-
सालाबादप्रमाणे दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी बेळगांव जिल्ह्यामधील निपाणी तालुक्यात असलेल्या तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी मध्ये श्री हालसिद्धनाथ देव...
-
श्री हालसिद्धनाथ महाराज यात्रा 2025 पाच दिवसीय असणाऱ्या भोंब यात्रेचा आज च्या दिवशी संध्याकाळी नाथांची महाआरती.नंतर गज्जी कार्यक्रम रात्री...
No comments:
Post a Comment