महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा येथील सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेळगाव जिल्हा निपाणी तालुक्यातील तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हलसिद्धनाथ महाराज यांच्या पाच दिवस चालणाऱ्या बोंब यात्रेची सांगता भाविकांच्या मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झाली. दिनांक 8 ऑक्टोंबर 2025 रोजी यात्रेला सुरुवात झाली पाच दिवस मंदिर मध्ये धार्मिक कार्यक्रम चालले रात्री ढोल जागर सबीना प्रदक्षिणा पालखी आणि मुख्य आकर्षण म्हणजे वाघापूर तालुका भुदरगड येथील श्री भगवान डोने महाराज वाघापूर व त्यांचे सुपुत्र श्री सिद्धार्थ डोने महाराज यांची भाकणूक ती ऐकण्यासाठी लांब लांबून भक्तांची उपस्थिती होती दिनांक 11 ऑक्टोंबर 2025 रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता त्या दिवशी महानैवैद्य आणि मुख्य भाकणूक होती सकाळी सात वाजता घुमटातील भाकणूक झाली. दिवसभर भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली रायबाग येथील मानकरी यांच्या हस्ते कर तोडून यात्रेच्या सांगतेला सुरुवात झाली. संध्याकाळी पाच वाजता ढोल सुरू झाले व त्यानंतर हालसिद्धनाथांची उत्सवमूर्ती पालखीत बसवून मंदिर भोवती प्रदक्षिणा घेऊन पालखी सबीना वाडा मंदिर कडे मार्गस्थ झाला पालखी सोहळ्यावर भाविक भक्तांनी अगदी मोठ्या प्रमाणात भंडारा खारीक खोबरे फुले लोकर याची मनसोक्तपणे आणि मोठ्या भक्ती भावाने उधळण केली दोन्ही पालख्या या वाड्या मंदिर मध्ये आल्यानंतर वाडीची पालखी वाडा मंदिर मध्ये विसावली व कुरलीची पालखी कुरलीकडे रवाना झाली. आणि यात्रेची सांगता झाली. यात्रा काळात यात्रा कमिटी यांनी योग्य प्रकारे नियोजन केलें होते सगळीकडे लाईट व्यवस्था उत्तम केली होती गावातील व गावात येणाऱ्या सर्व रस्त्यांची सफाई किंवा दुरुस्ती केली होती पोलीस प्रशासन व होम गार्डस आणि सर्व सुरक्षा रक्षकांनी अगदी चोख बंदोबस्त करून व्यवस्थित पणे ट्रॅफिक नियोजन केलें योग्य ठिकाणी पार्किंग करून कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेतली होती. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय जागोजागी प्रशासना मार्फत केली होती आणि सौन्दलगा आरोग्य केंद्रमार्फत आवश्यक अश्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध केली होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संपूर्ण पाच दिवस नाथ भक्तांना मोफत अगदी पुरेपूर अन्नछत्राचे आयोजन करणाऱ्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत कारण होणाऱ्या गर्दीचे नियोजन करून त्यांना योग्य प्रकारे अन्नदान करणे खरोखर कौतुकास्पद आहे अशाप्रकारे आप्पाचीवाडी येथील श्री क्षेत्र हालसिद्धनाथ महाराज यांची अश्विन भोंब यात्रा मोठ्या दिमाखात आणि भक्ती भावात पूर्ण झाली यात्रेसाठी सर्व मानकरी सेवेकरी आप्पाचीवाडी कुरली येथील सर्व ग्रामस्थ नागरिक संपूर्ण पंचक्रोशीतील भाविक प्रशासनातील अधिकारी ग्रामपंचायत मधील सर्व अधिकारी कर्मचारी गावातील व बाहेरील सर्व व्यापारी या सर्वांचे सहकार्याने यात्रा योग्य प्रकारे आणि गोडी गुलाबीने कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीतपणे पार पडली त्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. जय श्री हालसिद्धनाथ 🙏🙏